गोड्या पाण्यातील माश्याची “चिली” आणि “स्प्रिंग रोल” असे वेगळे पदार्थ आज सावंतवाडीत तयार करण्यात आले.निलक्रांती संस्था आणि मुळदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमाने हे प्रात्यक्षिक येेथिल हॉटेल पॉम्पस मध्ये घेण्यात आले.यावेळी खार्या पाण्याच्या माशाबरोबर गोड्या पाण्यातील माश्यांना सुध्दा तितकीच चव आहे.तसेच आरोग्याच्या दृष्टीने ते पोषक आहेत.त्यामुळे आता लोकांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.त्यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीने माश्याची शेती केल्यास रोजगाराचे नवे दालन उपलब्ध होवू शकते,असा दावा मुळदे महाविद्यालयाचे प्रमुख प्रदीप हळदोणेकर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना निलक्रांती संस्थेचे प्रमुख श्री तोरसकर म्हणाले गोड्या पाण्यातील जिवंत मासे हवयं पर्यंत पोहोचविण्याचा आपला मानस आहे. त्याठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्य शेती केल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मात्र गोड्या माशांना याठिकाणी बाजारपेठ नसल्यामुळे आणि जिल्ह्यातील खवय्यांचा कल हा खाऱ्या पाण्यातील माशांकडे असल्यामुळे गोड्या पाण्यातील मत्स्य शेती या ठिकाणी कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे गोड्या पाण्यातील माशांना पासून चिली स्प्रिंग रोल यांसारखे वेगवेगळे पदार्थ बनविल्यास त्यांचा आनंद या ठिकाणी येणार्या पर्यटकांना घेता येईल. असा विश्वासही श्री तोरसकर यांनी व्यक्त केला.
स्थळ: सावंतवाडी
दि.२२/०१/२०२१
श्री.रविकिरण चिंतामणी तोरसकर,
अध्यक्ष,नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था,मालवण