सिंधदुर्ग जिल्हा राज्यातील प्रमुख पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो.वर्षभरात सुमारे आठ ते दहा लाख पर्यटक आपल्या जिल्ह्यातील नैसर्गिक संपन्नता,ऐतिहासिक स्थळे,पुरातन मंदिरे यासाठी भेट देतात.त्याचबरोबर पर्यटकांसाठी मालवणी खाद्य पदार्थ हा एक महत्वाचा आकर्षणाचा भाग असतो.पर्यटन व्यवसायामध्ये मालवणी खाद्यसंस्कृतीचा वाटा खूप मोठा आहे.मालवणी खाद्यपदार्थामध्ये मत्स्य आहार हा एक महत्वाचा घटक आहे.
सिंधूदुर्गाला भेट देणाऱ्या पर्यटकांना नेहमी नवीन नवीन खाद्यपदार्थांचे आकर्षण असते.हाच धागा पकडून निलक्रांती रोजगार प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धी केंद्र,कोळंब, मालवण, माश्यापासून बनविण्यात येऊ शकणाऱ्या नाविन्यपूर्ण पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दि १६ मे २०१८ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत निलक्रांती रोजगार प्रशिक्षण व कौशल्यवृद्धी केंद्र ,कोळंब ,मालवण या ठिकाणी आयोजित केले आहे.सदर प्रशिक्षण मध्ये कु.अमिता जैन( M.F.Sc Fish processing) वडे,सामोसा,कटलेट,कोळंबी कोन,फिश फिंगर्स इत्यादी पदार्थ बनविणे शिकविणार आहे.महिला बचतगट,पर्यटन व्यावसायिक,हॉटेल व्यवसाय करणारे,गृहिणी यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात तसेच कौशल्यात वृद्धी करावी असे आवाहन निलक्रांती प्रतिष्ठान मार्फत करण्यात येत आहे.प्रशिक्षण निशुल्क असून ,वय तसेच शिक्षणाची अट नाही व फक्त २० प्रशीक्षणार्थीना प्रवेश दिला जाईल.नोंदणी साठी निलक्रांती केंद्राच्या संपर्क अधिकारी सौ.स्मिता केळुस्कर(09322073795)यांच्याशी
ठिकाण : निलक्रांती रोजगार प्रशिक्षण व कौशल्यवृद्धी केंद्र ,कोळंब ,मालवण
वेळ : १६ मे २०१८ ,सकाळी १० ते ५
संंपर्क : सौ.स्मिता केळुस्कर – 9322073795